Shashank Ketkar: मुंबईत अचानक आलेल्या पावसानं आणि धुळीच्या वादळानं चांगलीच भंबेरी उडवली. पहिल्याच पावसाच्या सरीमुळे मुंबईत अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यात घाटकोपरमध्ये घडलेली दुर्घटना ही अतिशय दुःखद होती. वाऱ्यामुळे कोसळलेल्या होर्डिंग खाली चिरडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेने सगळेच हादरून गेले. वेगवेगळ्या स्तरातून यावर प्रतिक्रिया येत असताना आता अभिनेता शशांक केतकर यांने देखील आपला संताप व्यक्त केला आहे. एक व्हिडीओ शूट करत त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.