Manoj Jarange Sabha Live Gangapur : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुरात संवाद मेळाव्यात मनोज जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत मराठ्यांना तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मराठा आंदोलकांना झालेली मारहाण, आरक्षण, आंदोलन आणि आरक्षणासंबंधित अन्य मुद्द्यांवर जरांगे पाटलांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी गर्दी केली होती.