Manoj Jarange Patil In Gangapur Sambhajinagar : मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राज्य सरकारला सुट्टी देणार नाही, सरकारने जेवढे डाव टाकले तेवढे मी उधळून लावलेले आहे. कोपऱ्यात किंवा कानात मी काहीही बोलत नाही, ऐकत नाही. त्यामुळं सरकारने समोर येवून मराठ्यांना आरक्षण देणार की नाही?, हे सांगायला हवं, असं वक्तव्य मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुरमध्ये आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी येत्या १४ ऑक्टोबरला जालन्यातील आंतरवाली सराटी येथे येण्याचंही आवाहन केलं आहे.