नवी मुंबईतील सीवूड्स, तलवे परिसरात पाणथळ समुद्रकिनाऱ्यावर हजारो फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी आश्रयासाठी येतात. हे गुलाबी, नयनरम्य दृष्य नजरेत कैद करण्यासाठी हजारो पक्षीप्रेमी येथे दररोज येतात. परंतु, बुधवारी एका माथेफिरू व्यक्तीने दगड भिरकावून पाणथळ जागेत शांत बसलेल्या हजारो फ्लेमिंगो पक्षांवर दगड भिरकावत त्यांना हाकलून लावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्यक्तिच्या कृत्यामुळे परिसरातील रहिवाशी तसेच पक्षीप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.