Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या खूप टेन्शनमध्ये आहे. अभिनेत्री नुकतीच तिची आई जॉयससोबत मुंबईतील हॉस्पिटलबाहेर दिसली. मीडिया रिपोर्टनुसार, मलायकाच्या वडिलांची तब्येत बरी नसून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या आईसोबत वडिलांना भेटायला गेली होती. रुग्णालयातून बाहेर पडतातच पापाराझींनी मलायकाकडे तिच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र, एकाही प्रश्नाचं उत्तर न देता मलायका सरळ गाडीचा दरवाजा लावून निघून गेली. यामुळेच आता ती प्रचंड ट्रोल होत आहे.