Malaika Arora-Arjun Kapoor: गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, या केवळ अफवा असल्याचे ते दोघेही वारंवार सिद्ध करत असतात. आता फराह खानसाठी दोघांनी खास जेवणाचा बेत केला होता. फराह खानच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीसाठी मलायकाने जेवण बनवलं होतं. तर, अर्जुन हे जेवण घरून घेऊन आला होता. या व्हिडीओमधून तिने दोघांचे आभार मानले आहेत. यावरून हे सिद्ध होते की, दोघांचाही ब्रेकअप झालेला नाही.