बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा दिल्ली विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला चाहत्यांनी घेरल्याचे दिसत आहे. त्यानंतरही मलायका अतिशय शांत दिसत आहे. दरम्यान, मलायकाने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.