Rohit Pawar on CM : शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या राजकीय पक्षांना उत्तरं दिली. विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला आहे. उद्या सत्ता आल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आघाडीचे नेते ठरवतील. आमच्या पक्षापुरतं बोलायचं झाल्यास आमच्याकडं जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड अशी अनेक नावं आहेत. शरद पवार साहेबांनी ठरवलं तरी पहिली महिला मुख्यमंत्री देखील महाराष्ट्राला मिळू शकते, असंही रोहित पवार म्हणाले.