कर्नाटकात सीमाभागातील मराठी भाषिकांवरील होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सीमाभागातील नागरिकांचा मुद्दा विधानसभेत मांडला. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी आणि हा प्रश्न सुटेपर्यंत कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्याय थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी भुजबळ यांनी केली.