Madhuri Dixit: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचा पती डॉ. श्रीराम नेने, मुलगा अरीन, रायन, वडील माधव नेने, आई अनू नेने यांनी सहकुटुंब प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पंचक’ या चित्रपटासाठी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यांचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.