आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रीतील पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्राबाहेर रांगेत लागले आहेत. मराठी अभिनेता प्रविण तरडे यांनी देखील कुटुंबीयांसोबत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.