Narendra Modi Dindori Speech Video : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं जाहीर सभा घेतली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांनी 'नकली' म्हणून डिवचलं. नकली शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणं निश्चित आहे. त्यावेळी मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल. ज्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस झालीय, तेव्हा शिवसेना बरखास्त करून टाकेन, असं बाळासाहेब म्हणायचे. आज तीच वेळ आली आहे, असं मोदी म्हणाले. बाळासाहेबांना आताचं चित्र बघून दु:ख होत असेल. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांच्या स्वप्नांचा चुराडा केलाय, असा आरोप मोदी यांनी केला.