Jayant Patil Speech in Islampur : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी सांगलीतील इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. सर्वांनी घासूनपुसून निवडणुकीचं काम करा. समोरचा माणूस तुमच्या घरी चहा घ्यायला आला, तर तुम्ही घरात जाऊ नका. आमचे संबंध आहेत वगैरे हे धंदे मला चालणार नाहीत. तुमचे वैयक्तिक संबंध निवडणुकीनंतर जपा. आता निवडणूक आहे, असं जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बजावलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजीत (आबा) पाटील हे महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढत आहेत.