leopard at rashtrapati bhavan : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झाला. यावेळी एकूण ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. या सोहळ्याला ६ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एक अनोळखी पाहुणाही आला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडिओ असून त्यात एक वन्य प्राणी पायऱ्यांवरून जाताना दिसतो. तो रानटी प्राणी कोणता आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी तो बिबट्याच असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. तसं असेल तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय मानला जात आहे.