मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमानच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

Video: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमानच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

Apr 11, 2024 07:05 PM IST Aarti Vilas Borade
Apr 11, 2024 07:05 PM IST
  • बॉलिवूडचा भाईजान म्हणजे अभिनेता सलमान खानला ईदच्या शुभेच्छा देण्याची चाहत्यांची इच्छा असते. काही चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईजानला शुभेच्छा देतात तर काही मुंबईतील त्याच्या घराबाहेर उभे राहून शुभेच्छा देताना दिसतात. सलमान देखील चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये येतो. पण ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांनी सलमानच्या घराबाहेर तुफान गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ही गर्दी हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, चाहते तेथून हालत नसल्यामुळे नाईलाजास्तव अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp