Kriti Sanon: सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी धुमधडाक्यात साजरी करताना दिसत आहेत. काही बॉलिवूड कलाकारांनी दिवाळीच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले आहे. यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनचा समावेश आहे. क्रिती सेनॉनच्या पार्टीला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यामध्ये हुमा कुरैशी, कतरिना कैफ, विकी कौशल, सोनू सूद, तापसी पन्नू, हिमेश रेशमीया, अरबाज खान, रितेश देशमुख, जिनिलिया डिसूजा, शिल्पा शेट्टी अशा अनेक कलाकारांचा समावेश होता.