dhananjay mahadik tweet on doctor: रुग्ण नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे आला असताना अचानक त्याचे हृदय बंद पडले. यावेळी डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत तिथेच प्राथमिक उपचार केल्यानं रुग्णाचा जीव वाचला. कोल्हापूरच्या स्वस्तिक रुग्णालयात डॉक्टर अर्जुन आडनाईक यांच्यासमोर हा प्रकार घडला. याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.