गुडघा पायाचा एक महत्त्वपूर्ण सांधा आहे. अतिवापरामुळे शरीरातील प्रमुख सांध्यांना दुखापती होतात. गुडघा तयार करणाऱ्या हाडे, कूर्चा आणि अस्थिबंधन यांना बऱ्याचदा दुखापत होऊ शकते आणि गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. घोट्याची दुखापत झाली असेल, तर तुम्ही ‘राइस’ (RICE) अर्थात रेस्ट, आइस, कंप्रेशन आणि एलिव्हेशन हे उपचार घेतले पाहिजेत. हे लक्षात ठेवा की ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात किंवा संक्रमण यांसारख्या वैद्यकीय स्थितींमुळे देखील गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो.