Kartik-Kiara: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच अनेक गाणीही रिलीज झाली आहेत, जी लोकांना खूप आवडली आहेत. दरम्यान, नुकतेच या चित्रपटाचे नवीन गाणे 'सुन सजनी' लाँच करण्यात आले. या लाँचिंग कार्यक्रमात नवीन गाण्यापेक्षा कार्तिक आर्यनच्या सरप्राईज एन्ट्रीने लोकांची मने जिंकली आहेत. या लाँचिंग सोहळ्यात कार्तिक आणि कियारा यांनी सरप्राईज एन्ट्री घेतली होती.