भारतात लिव्हर कॅन्सर मृत्यूचे पाचवे कारण ठरत आहे. याचे वाढते प्रमाण पाहता पुढील काही वर्षात हा तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लिव्हर कॅन्सरला प्रतिबंध कसे करावे व याचे वेळीच आणि अचूक निदान कसे करता येईल याविषयी जाणून घेऊया. हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा हा प्राथमिक कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. लिव्हरच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आढळून येत नाहीत. कारण ती अपचन व गॅससारखीच दिसून येतात. यकृताचा कर्करोग टाळता येत नसला तरी धोका कमी करता येतो. यकृताचा कर्करोग प्रतिबंध ही कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. अल्ट्रासाऊंड सारख्या इमेजिंग चाचण्या वापरून नियमित स्क्रीनिंगचा करणे गरजेचे आहे.