केदारनाथ यात्रा खंडित झाली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अधिकाऱ्यांनी ही यात्रा थांबवली आहे. त्यामुळे शेकडो वाहने रस्त्यावर अडकून पडली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहने जाण्यासाठी यंत्रणा दुरुस्त करत आहे. मंदाकिनी आणि अलकनंदा नद्या ओसंडून वाहत आहेत.