Katrina Kaif-Vicky Kaushal: कतरिना कैफ तिच्या ४०व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी विकी कौशलसोबत मुंबईतून बाहेर फिरायला निघाली आहे. मात्र, यंदा ती तिचा वाढदिवस कुठे साजरा करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विकी कौशल आणि कतरिना कैफ या जोडीला नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी कतरिना कैफने फ्लोरल टॉप आणि डेनिम जीन्स घातली होती. तर, विकी कौशल ट्रॅक सूटमध्ये दिसला. विकी कौशलने डोक्यावर टोपी घातली होती आणि गॉगल लावला होता.