‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांसोबत कार्तिकने थिएटरमध्ये डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.