Kartik Aaryan at Ahmedabad: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच येत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं तो नुकताच अहमदाबादला गेला होता. कार्तिक आल्याचं समजताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. कार्तिक आपल्या कारकडं जात असतानाच शेकडो लोक त्याच्या मागे येत होते. कार्तिक, कार्तिक असा गजर करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.