Kartik Aaryan and Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच अनेक गाणीही रिलीज झाली आहेत, जी लोकांना खूप आवडली आहेत. दरम्यान, नुकतेच या चित्रपटाचे आगाऊ बुकींग देखील सुरू झाले आहे. याचं उद्घाटन स्वतः कार्तिक आणि कियारा यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी हार्टशेप दरवाजा उघडून प्रेक्षकांना आपल्या चित्रपटासाठी थिएटरमध्ये येण्याचं आव्हान केलं.