Kartik Aaryan: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळेच कार्तिक आर्यनने चाहत्यांना सरप्राईज द्यायचे ठरवले आणि तो थेट जुहूच्या थिएटरमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने चाहत्यांसोबत फोटो काढले.