अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर हे त्यांची मुले तैमूर अली खान व जेह अली खान यांच्यासोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. गुरुवारी हे कुटुंब मुंबईत परतले. एअरपोर्टवर पापाराझींनी खान कुटुंबाला स्पॉट केले. एअरपोर्टवरील जेहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो रडताना दिसत आहे.