बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आज १४ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, कंगनाने फोटोग्राफर्ससोबत धमाल केली आहे. तिने काही फोटो काढले आहेत.