Jiya Shankar: ‘बिग बॉस ओटीटी २’मधून बाहेर आल्यानंतर प्रत्येकाच्या करिअरमध्ये एक टर्निंग पॉइंट येत आहे. या शोमध्ये सामील झालेल्या काहींची लोकप्रियता तुफान वाढली आहे. तर, काहींना नव्या संधी मिळाल्या आहेत. आता ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातून बाहेर आल्यानंतर ‘वेड’ फेम अभिनेत्री जिया शंकर हिने एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. जियाचा या नव्या गाडीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तर, चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.