बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक नुकताच लग्नबंधनात अडकली आहे. शनिवारी मुंबईत तिच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आले. १० जानेवारीला उदयपुरमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आयरा विवाह बंधनात अडकली. आता १३ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. सध्या सोशल मीडियावर रिसेप्शनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी जया बच्चन यांना चांगलेच सुनावले आहे.