अनेक अभिनेत्री ग्लॅमरस अंदाजात रॅम्पवर वॉक करताना दिसतात. नुकताच अभिनेत्री जॅस्मिन भसीनने देखील एका फॅशन शोमध्ये रॅम्पवर वॉक केला आहे. यावेळी तिने सोनरी रंगाचा सुंदर आणि हटके ड्रेस परिधान केला आहे. मोठे कानातले, मोकळे केस या लूकमध्ये जॅस्मिन सुंदर दिसत आहे. पण रॅम्पवर चालताना जॅस्मिनचा ड्रेसमध्ये पाय अडकला आणि ती पडता पडता वाचली.