बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची लेक इशा खान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ती फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. मराठमोळ्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आमिर खानच्या वांद्रे येथील घरी लेकीच्या लग्नाची तयारी करण्यात आली आहे. घराला रोशनाई करण्यात आली आहे.