Naresh Bansal Speech In Rajya Sabha : देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडियन नॅशनल डिवेलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स अर्थात इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपा आणि इंडिया आघाडीत जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार नरेश बन्सल यांनी संविधानातून इंडिया हा शब्द वगळण्याची मागणी केली आहे. इंडिया हे नाव ब्रिटिशांच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे. त्यामुळं संविधानात इंडियाचं नाव भारत असं केल्यास भारतमाता गुलामगिरीच्या जंजाळातून मुक्त होणार असल्याचंही नरेश बन्सल यांनी म्हटलं आहे.