पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. भारताने कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा २-१ ने पराभव केला. भारताचा गोलकीपर आणि ग्रेट वॉल म्हणून ओळखला जाणारा पीआर श्रीजेश याचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. अशा स्थितीत भारतीय हॉकी संघाने श्रीजेश याला विजयी निरोप दिला. भारताने कांस्यपदक जिंकताच केरळच्या एर्नाकुलम येथील श्रीजेशच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली. त्याच्या संपूर्ण परिवाराने फटाके फोडत आणि मिठाई वाटत सेलिब्रेशन केले. गोलकीपर पीआर श्रीजेश याने भारतीय हॉकीची १८ वर्षे सेवा केली आणि ३३५ सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले.