मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  चहाचा गाडा चालवणाऱ्या दाम्पत्याने केली उपजिल्हाधिकाऱ्याची धुलाई, पाहा VIDEO

चहाचा गाडा चालवणाऱ्या दाम्पत्याने केली उपजिल्हाधिकाऱ्याची धुलाई, पाहा VIDEO

Jul 21, 2022 11:14 PM IST Shrikant Ashok Londhe
Jul 21, 2022 11:14 PM IST

हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर जिल्ह्यातील आहोत. व्हिडिओमध्ये  महिला आणि तिचा पती ज्याची धुलाई करत आहेत, ते कोणी सामान्य व्यक्ती नसून उपजिल्हाधिकारी आहेत. निवडणूक ड्यूटीसाठी  बुधवारी सकाळी ते पिपलियामंडीकडे आपल्या खासगी वाहनाने जात होते. रस्त्यात एक मोटार सायकलस्वार स्टंट करत होता व उपजिल्हाधिकाऱ्यांना साईड देत नव्हता. मोटारसायकलस्वार तरुणाला समजावताना जवळच चहाचा गाडा चालवणारे पती-पत्नी डेप्युटी कलेक्टर अरविंद भाभोर यांच्याशी वाद घालू लागले. त्यांना त्यांना शिवीगाळ केली तसेच महिलेने चप्पल काढून त्यांच्यावर हल्ला केला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp