मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना एकत्र जोडणारा 'कन्नी' चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी 'कन्नी' चित्रपटाच्या टीमने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री ऋता दुर्गुळे उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर तिचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे