Sharad Pawar Video : महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आमदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्यातील ओतूर इथं शरद पवार यांची जाहीर सभा झाली. महाराष्ट्रात एक अस्वस्थ आत्मा भटकतोय, त्याच्यापासून महाराष्ट्राची सुटका करा, अशी अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत शरद पवार यांच्यावर केली होती. त्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं. होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वार्थासाठी नाही. माझा शेतकरी दु:खी आहे. सामान्य माणूस महागाईमुळं संकटात आहेत. लोकांना संसार करणं अवघड झालं आहे, म्हणून मी अस्वस्थ आहे. सामान्यांचं दुखणं मांडण्यासाठी मी शंभर वेळा अस्वस्थता दाखवेन,' असं शरद पवार यांनी ठणकावलं.