Hina Khan Cut Her Hairs: छोट्या पडद्यावरील ‘अक्षरा बहु’ म्हणजेच अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. अभिनेत्रीला स्टेज ३चा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. यानंतर तिचे चाहते देखील काळजीत पडले आहेत. मात्र, हिना खान या सगळ्या परिस्थितीशी अतिशय हिमतीने लढा देत आहे. मी या कॅन्सरसारख्या आजारावर मात करून पुन्हा परतेन, असं तिनं आत्मविश्वासानं सांगितलं आहे. हिना खानची केमोथेरपी सुरू झाली असून, या थेरपीच्या पहिल्या सेशननंतर अभिनेत्रीने तिचे केस कापले आहेत. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.