छोट्या पडद्यावरील 'विरल भाभी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हेमा शर्मा सध्या चर्चेत आहे. या चर्चा हेमाने रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना छत्र्या वाटल्यामुळे सुरु झाल्या आहेत. सध्या पावसाळा सुरु आहे आणि पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी आपण छत्री घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. फूटपाथवर राहणाऱ्या लोकांची सध्या कसरत सुरु आहे. त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून हेमाने छत्री वाटप केला आहे. अभिनेत्रीचा हा छत्री वाटतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.