Hema Malini In Lok Sabha Election 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकीत, बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी यूपीच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या मुकेश धनगर यांचा मोठ्या फरकाने पराभव करत हेमा मालिनी विजयी झाल्या आहे. मथुरा मतदारसंघातून हेमा मालिनी यांचा हा सलग तिसरा विजय आहे. विजयाची हॅटट्रिक नोंदवून तिने खऱ्या अर्थाने आपल्या चाहत्यांची 'ड्रीम गर्ल' असल्याचे सिद्ध केले आहे.