Hema Malini: बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा ‘गदर २’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आले आहे. सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना यांच्यानंतर आता सनीची सावत्र आई हेमा मालिनी देखील हा चित्रपट पाहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. ‘गदर २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.