Hema Malini At Mahakaleshwar Temple: आज सगळीकडेच ‘महाशिवरात्री’चा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. भगवान महादेवाची आराधना करून महाशिवरात्री साजरी केली जात आहे. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या देखील महाशिवरात्री निमित्ताने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले.