Heavy rainfall in pune : पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यात सर्वत्र दाणादाण उडवली. शहर व परिसरात जवळपास चार ते साडेचार तासात तुफान पाऊस झाल्याने पुण्यातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं होतं. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले तसेच एकूण ३२ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.