Ambarnath Thane Rain Updates : मुंबईसह ठाणे आणि अंबरनाथमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं उपनगरांमधील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय अंबरनाथमधील कुरसावले पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोरेगाव सर्कल, कुरसावले पूल परिसर, अंबरनाथ शहर, शिव मंदिर परिसरासह ठाण्यातील अनेक भागांमध्ये ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं.