Pune flood : पुण्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणे भरले असून खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असल्याने पुन्हा एकदा सिंहगड रस्ता परिसरात पुर आला आहे. एकता नगर परिसरात पाणी घुसले आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.