Pune Rain : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी व सोमवारी संध्याकाळी झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. रस्ते जणू ओढ्या प्रमाणे वाहू लागले होते. या पावसामुळे पुण्यातील विकास कामांची पोल खोल झाली.