Pune Rain news : पुण्याला आज वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. तब्बल दोन तास झालेल्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी झाडी कोसळली. येरवडा परिसरात रामनगर भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा चालकाच्या अंगावर झाड पडल्याने त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या कार, रिक्षा आणि दुचाक्यांवर झाडी कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली होती.