Heavy Rain In Navi Mumbai: मुंबईसह नवी मुंबईतही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं सगळीकडेच धुमाकूळ घातलाय. पावसाच्या संतत धारेमुळे सखल भागात पाणी साचले असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील काही ठिकाणी पाणी भरले असून, भाजी मार्केटमध्ये विक्रेत्यांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे भाज्या खराब होऊ नयेत, यासाठी विक्रेत देखील लवकरात लवकर त्यांचा सौदा करत आहेत.