Pune Sus Pashan hit and run : पुण्यातील बाणेर-सूस रस्त्यावर ननावरे चौकाजवळ गुरुवारी (०५ डिसेंबर) दुपारी अपघाताची घटना घडली. एका भरधाव कारचालकाने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. सुदैवाने, या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंरतु, अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.