पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या नीरज चोप्राने याने भालाफेकीत रौप्य पदक जिंकले. नीरजला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाचा बचाव करता आला नाही, यावेळी सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे गेले आहे. नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र नदीमने सुवर्णपदक जिंकून संपूर्ण जगाला चकित केले.अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम रचत सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला. नीरजने रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया आली आहे.